S M L

राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी होणार स्वस्त - गिरीष बापट

Samruddha Bhambure | Updated On: Mar 3, 2016 10:39 PM IST

petrol_price_hike

03 मार्च : येत्या आठ दिवसांत महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलेंडर आणि रॉकेलचे दर कमी होणार आहेत. ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांनी यासंदर्भातील माहिती दिली. पेट्रोलवर 95 पैसे, डिझेलवर 66 पैसे स्वस्त होणार आहे. घरगुती इंधनावर काही प्रमाणात सूट मिळणार आहे.

तेल कंपन्यांनी लावलेला अतिरिक्त अधिभार कमी करण्यासाठी ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांची पेट्रोलमंत्री केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या बरोबर झालेली बैठक यशस्वी ठरली आहे. त्यामुळे राज्यात आता पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी स्वस्त होणार आहे.

फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनने राज्य विशेष अधिभारद्वारे बेकायदेशीर अतिरिक्त वसूली करत असल्याची तक्रार केली होती. यानंतर बापट यांनी तेल कंपन्यांची बैठक घेतली. या बैठकीत तेल कंपन्यांनी अतिरिक्त वसुली केल्याचं मान्य केलं. त्यानंतर तेल कंपन्यांनी राज्य विशेष अधिभार कमी करण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पाठवला होता.

या प्रस्तावाचा पाठपुरावा करत बापट यांनी आज प्रधान यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्र्यांनीही या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे येत्या आठ दिवसांत राज्यात पेट्रोल, डिझेल तसंच घरगुती इंधनावरही काही प्रमाणात सूट मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2016 10:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close