S M L

.. काँग्रेसला लाज वाटायला हवी - अमित शहा

Samruddha Bhambure | Updated On: Mar 5, 2016 05:59 PM IST

amit shah adlbakjrh

05 मार्च :  देशाच्या विरोधातील घोषणाबाजी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं का?, असा सवाल विचारत भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज (शनिवारी) काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जेएनयूच्या भेटीवर टीका केली. 'राहुल यांनी 'जेएनयू'ला भेट दिली, याची काँग्रेसला लाज वाटायला हवी' अशी टीका अमित शाह यांनी केली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या एका बैठकीमध्ये अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. 'देशात विचित्र वातावरण निर्माण केलं जात आहे. देशविरोधी घोषणा म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यय असं भासवलं जात असाताना काँग्रेसचे उपाध्यक्ष 'जेएनयू'ला भेट देऊन, देशविरोधी घोषणाबाजी करणार्‍यांचं समर्थन करतात, हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना मान्य आहे का, असा सवालही शाह यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2016 05:58 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close