S M L

दहशतवाद्यांच्या टार्गेटवर महाशिवरात्री, 10 दहशतवादी गुजरातमध्ये घुसले

Sachin Salve | Updated On: Mar 6, 2016 02:41 PM IST

Terror attack131गुजरात - 06 मार्च : महाशिवरात्रीच्या दिवशी घातपात घडवण्यासाठी लष्कर ए तोयबाचे 10 दहशतवादी गुजरातमध्ये घुसल्याची माहिती गुप्तचर खात्याने दिले आहे. त्यामुळे देशभरात हायअलर्ट जारी कऱण्यात आलाय.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी याविषयी भारताला माहिती दिल्याचं समजतंय. गुजरातचे पोलीस महासंचालकानी संपूर्ण राज्यात हायअलर्ट घोषित केलाय. या संदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली, सर्व पोलीस अधिकार्‍यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्यात. महाशिवरात्रीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. या दहशतवाद्याचा युद्धपातळीवर शोध सुरू असून, अजून त्यांच्याबद्दल ठोस माहिती मिळू शकलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2016 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close