S M L

कोट्यधीश महिला खासदार

13 मार्चलालूप्रसाद, मुलायम आणि शरद यादव या मंडळींचा सध्याच्या महिला आरक्षण विधेयकाला तीव्र विरोध आहे. यामुळे केवळ उच्चवर्णीय, श्रीमंत महिलाच खासदार होऊ शकतील, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या म्हणण्याला बळकटी देणारी एक आकडेवारी समोर आली आहे. आणि ती म्हणजे संसदेतील 59 महिला खासदारांपैकी 40 महिला खासदार कोट्याधीश आहेत.लोकसभेत एकूण 59 महिला खासदार आहेत. यापैकी 40 महिला म्हणजेच 68 टक्के महिला खासदार कोट्याधीश आहेत. 484 पुरुष खासदारांपैकी 275 पुरुष खासदारांकडे बक्कळ पैसा आहे. टक्केवारीत 57 टक्के पुरुष खासदार हे कोट्याधीश आहेत.मध्यप्रदेशचे काँग्रेसचे खासदार राजकुमार रत्नासिंग हे महिला खासदारांपैकी सगळ्यात जास्त श्रीमंत खासदार आहेत. त्यांच्याकडे 67 कोटींची संपत्ती आहे. कृषी मंत्री शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे 50 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्यापाठोपाठ प्रिया दत्त यांच्याकडे 34 कोटींची संपत्ती आहे.या श्रीमंत महिला उच्च शिक्षितही आहेत. 116 पुरुष खासदारांच्या तुलनेत 16 महिला खासदार पोस्ट ग्रॅज्युएट आहेत.151 ग्रॅज्युएट खासदारांपैकी 13 महिला खासदार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2010 03:07 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2010 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close