S M L

देणारा देत गेला...

15 मार्चआपले लाडके विंदा... ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर... म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर. विंदांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात धालवल या गावी झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूरला झाले. ते 1935 साली मॅट्रीक झाले. शिक्षकी पेशा स्विकारलेल्या विंदांची स्वेदगंगा ही गाजलेली कविता. श्रमशक्तीचे, कष्टकर्‍यांच्या संघटीत शक्तीचे महत्व सांगणारी ही कविता.मार्क्सवादी विचारांच्या प्रभावातून 1944 साली निर्माण झाली. त्यांचा पहिला कवितासंग्रह आला स्वेदगंगा- 1949 साली.. त्यानंतर मृदगंध, धृपद, जातक, विरुपका असे सरस कवितासंग्रह त्यांनी लिहिले. मुलांमध्ये मुल होऊन 'स्वप्नात पाहिली राणीची बाग' लिहिणार्‍या विंदाचे राणीची बाग, एकदा काय झालं, सशाचे कान, परी ग परी, एटू लोकांचा देश हे बालकवितासंग्रह गाजले. अजबखाना, सर्कसवाला, पिशीमावशी आणि तिची भुतावळं, अडमतडम, टॉप, सात एके सात, बागुलबोवा हे संग्रही बच्चेकंपनीत प्रिय आहेत. विंदाना तत्वज्ञानाची ओढ असल्यानेच अष्टदर्शने या पुस्तकाची निर्मिती झाली. पाश्चात्य आणि भारतीय तत्वज्ञांची ओळख करुन देणासाठी त्यांनी अभंगाची रचना वापरली. या पुस्तकासाठी त्यांना 2003 चा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. अमृतानुभवाचे अर्वाचीनीकरण हा त्यांचा एक वेगळा प्रयोग. ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव त्यांनी आधुनिक मराठीमध्ये सांगितला. आणि तोही काव्याच्या रुपात. सोव्हिएत लँड नेहरु पुरस्कार जनस्थान पुरस्कार, कबीर पुरस्कार, साहित्य अकादमीचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. लोकप्रिय असूनही ते मीडियापासून नेहमीच चार हात लांब राहिले.विदांच्या या कवी असण्याशिवाय त्यांची आणखी ओळख म्हणजे टीकाकार, भाषांतरकार, मराठी आणि इंग्रजी साहित्याचा आस्वाद घेणारे रसिक वाचक. ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, फाऊस्ट, आणि राजा लिअर हि त्यांची अनुवादीत पुस्तके प्रसिद्ध आहेत. तर लिटरेचर ऍज अ व्हायटल आर्ट, अ क्रिटीक ऑफ लिटररी व्हॅल्युज ही त्यांची इंग्रजी समिक्षात्मक पुस्तके. त्यांची साहित्य संपदा इतर भाषांमध्येही भाषांतरीत झाली आहे. विंदा म्हणायचे - 'लेखक दोन अंगानी वाढतो. एक जीवनातला अनुभव आणि जाणीवेच्या अंगाने आणि दुसरं- या जाणीवेची कलात्मक बंदीश करताना जे यशापयश येतं त्यातून.. म्हणजेच लेखकाचं आतून वाढणं महत्वाचं.' असा हा संवेदना जपणारा साहित्यिक. ज्यात आनंद आहे, त्यांच्याच शब्दात सांगायचे तर जे व्हर्थव्हाईल आहे तेच जगायचे, असे मानणारे आणि तसेच जगणारे विंदा. विज्ञानावर अपार श्रद्धा असणार्‍या विंदांनी मरणोत्तर देहदान केले. हा महाकवी आपल्यातून गेला आहे. पण त्यांचे देणे आपल्यासोबत कायम राहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2010 07:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2010 07:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close