S M L

ईपीएफच्या व्याजावरील कराचा प्रस्ताव अखेर रद्द; जेटलींची संसदेत घोषणा

Samruddha Bhambure | Updated On: Mar 8, 2016 05:41 PM IST

arun jaithley213

नवी दिल्ली – 08 मार्च : पीएफवरील प्रस्तावित कर अखेर मागे घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (मंगळवारी) लोकसभेत याबाबतची घोषणा केली. त्यामुळे नोकरदारवर्गाला दिलासा मिळाला आहे.

नोकरदारांच्या गुंतवणूक वाढीसाठी सरकार त्यांच्या पीएफ रकमेवर कर लावण्याच्या विचारात होते. लोकांनी गुंवतणूक कुठे करावी, याला पसंती हवी. त्याचबरोबर लोकांनी निवृत्ती वेतन योजनेत सहभागी व्हावं, ही यामागेची संकल्पना होती. मात्र, हा निर्णय मागे घेण्यात येत आहे, अशी माहिती जेटली यांनी आज लोकसभेत केली. त्यामुळे पीएफवरील प्रस्तावित कराच्या विषयावर पडदा पडला आहे.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री जेटली यांनी पीएफवर कर आकारण्याची घोषणा केली होती. त्यावर देशभरातून टीका करण्यात आली. त्यानंतर पीएफच्या मुद्दलावर नव्हे तर व्याजावर कर आकरण्यात येणार असल्याचे स्पस्टीकरण सरकारच्यावतीने देण्यात आले. मात्र, पीएफवर कोणताही कर आकारू नये, अशी जोरदार मागणी नोकरदारांसह विरोधी पक्षांनी तसंच भाजपातील काही नेत्यांनी लावून धरली.

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावून जेटीला यांना पीएफ कर आकारणीच्या प्रस्तावाचा फेरविचार करण्याच्या सुचना केल्या होता. त्यानंतर जेटली यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना संसदेत निवेदन करण्याविषयीचे पत्र दिलं. त्यावर पीएफ करप्रस्तावासंदर्भात जेटली लोकसभेत उत्तर दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2016 01:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close