S M L

ओवेसी तर गल्लीतले नेते - जावेद अख्तर

Samruddha Bhambure | Updated On: Mar 16, 2016 02:24 PM IST

ओवेसी तर गल्लीतले नेते - जावेद अख्तर

नवी दिल्ली-16 मार्च : असादुद्दीन ओवेसी यांना आपण राष्ट्रीय नेता असल्याचं वाटतं मात्र त्यांची लायकी गल्लीतल्या नेत्याहून मोठी नाही, असं जोरदार प्रत्युत्तर प्रसिद्ध कवी, गीतकार आणि राज्यसभेचे खासदार जावेद अख्तर यांनी दिलं आहे.

भारत माता की जय म्हणण्यात गैर काय आहे? मातेचा जयजयकार करणं हे माझं कर्तव्य आहे की नाही मला माहित नाही. पण तो माझा अधिकार आहे, आणि जो मी बजावणारच, असं म्हणत त्यांनी सभागृहात त्रिवार 'भारत माता की जय' अशी घोषणा दिली.

एमआयएमचे सर्वेसर्वा असादुद्दीन ओवेसी यांनी लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना गळय़ावर सुरी ठेवली तरी भारतमाता की जय म्हणणार नाही, असं म्हटलं होतं. त्याला जावेद अख्तर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

त्याबरोबर, सत्ताधारी पक्षातील जे नेते भडकाऊ विधानं करतात, अशा नेत्यांना रोखण्याचं आवाहनही जावेद अख्तर यांनी सरकारला केलं. आपल्याला विकास करायचाय, फालतू गोष्टींवर वाया घालवण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2016 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close