S M L

विक्स अॅक्शन 500 गोळीवर बंदी

Sachin Salve | Updated On: Mar 16, 2016 10:41 PM IST

विक्स अॅक्शन 500 गोळीवर बंदी

नवी दिल्ली - 16 मार्च : विक्स अॅक्शन 500 या सर्दी आणि डोकेदुखीच्या गोळीवर सरकारने बंदी घातली आहे. ही गोळी तब्येतीसाठी धोकादायक ठरू शकते, असा निष्कर्ष आरोग्य मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने म्हटलंय.

या गोळीत असलेल्या अनेक घटक रसायनांची उपचारांसाठी असलेली उपयुक्तता सिद्ध होत नाही, असं या समितीने म्हटलंय. विक्स ऍक्शन 500 सोबतच इतर 343 औषधांवरही सरकारने बंदी घातली आहे. या गोळ्यांची निर्मिती प्रॉक्टर अँड गँबल नावाची अमेरिकन कंपनी करते.

या कंपनीने ताबडतोब या गोळीचं उत्पादन थांबवलं आहे. पण आमची सर्व औषधं सखोल संशोधनानंतर आणि पुरेशा चाचण्या करूनच तयार करण्यात आली आहेत, असा दावाही कंपनीने केलाय. फायझर या कंपनीचं कोरेक्स आणि ऍबॉट या कंपनीचं फेन्सेडाईल या दोन सिरप्सवरही बंदी घालण्यात आलीये. या दोन्ही कंपन्या सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचा विचार करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2016 10:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close