S M L

सरकारी जाहिरातीत आता राज्यपाल आणि मुख्यमंत्रीही झळकणार

Samruddha Bhambure | Updated On: Mar 18, 2016 01:14 PM IST

03TH_SUPREME_COURT_1319497f

नवी दिल्ली - 18 मार्च : सरकारी जाहिरातींवर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांचेच फोटो वापरण्याच्या आपल्या आदेशात सुप्रीम कोर्टाने आज (शुक्रवारी) सुधारणा करून त्यात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री यांचेही फोटो वापरण्याला मंजुरी दिली. कोर्टाच्या या निर्णयाचा राज्यांतील अनेक मंत्र्यांना फायदा होणार आहे.

गेल्या वर्षी शासकीय जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्य सरकारचे मंत्री यांच्यासह राजकीय नेत्यांची फोटो वापरण्यावर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली होती. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात अनेक राज्यांनी आणि केंद्र सरकारनेही फेरविचार याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सरकारी जाहिरातींमध्ये राज्यांतल्या राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाती सहकारी मंत्री यांचेही फोटो जाहिरातींमध्ये वापरण्यास परवानगी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2016 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close