S M L

'शक्तिमान'चा पाय तोडणार्‍या भाजप आमदाराला 14 दिवसांची कोठडी

Sachin Salve | Updated On: Mar 18, 2016 08:07 PM IST

'शक्तिमान'चा पाय तोडणार्‍या भाजप आमदाराला 14 दिवसांची कोठडी

डेहराडून - 18 मार्च : भाजपच्या एका आमदाराने एका घोड्यावर हल्ला केला होता आणि यात या घोड्याला आपला पाय गमवावा लागलाय. या क्रूर आमदाराला आज म्हणजे 4 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. गणेश जोशी असं या आमदाराचं नाव आहे. या आमदाराला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

डेहराडून आंदोलनादरम्यान भाजपचे आमदार गणेश जोशी यांनी 'शक्तिमान' नावाच्या घोड्यावरच हल्ला चढवला. गणेश जोशी यांनी या घोड्यावर अमानुष लाठी हल्ला केला. या घोड्यावर काल रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यात त्याचा पाय कापावा लागला. आता या घोड्याला पायावर उभं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शक्तिमान असं या घोड्याचं नाव आहे. चिंतेची गोष्ट ही आहे की पाय कापल्यावर घोडा जिवंत राहण्याची शक्यता फक्त 2 टक्के असते. याचं कारण घोडा कधीच जमिनीवर आडवा होत नाही, तो झोपतोही उभ्याउभ्याच.. त्यामुळे आता हा घोडा वाचावा, अशी प्रार्थना देशभरातून होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2016 08:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close