S M L

'भारत माता की जय' घोषणा देत कन्हैया कुमारवर चप्पलफेक

Sachin Salve | Updated On: Mar 24, 2016 07:45 PM IST

jnu_kanhyalalहैदराबाद - 24 मार्च : जेएनयू छात्र संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमारवर एका कार्यक्रमात चप्पल भिरकावण्यात आली. चप्पल फेकरणार्‍या व्यक्तीने 'भारत माता की जय' अशी घोषणा देत चप्पल फेकली.

हैदराबादमध्ये एका कार्यक्रमासाठी कन्हैयाकुमार हजर होता. या कार्यक्रमात बोलत असतांना एका व्यक्तीने कन्हैयाकुमारवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. त्याने भारत माता की जय असा जयघोष कन्हैया कुमारच्या दिशेनं चप्पल फेकली. पण, उपस्थिती असलेल्या लोकांनी त्याला अडवलं. लोकांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं असता कन्हैयाकुमारने त्या व्यक्तीला सोडून देण्याची सुचना केली. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं. हैदाराबाद विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी कन्हैयाकुमारला हजर राहायचं होतं पण त्याला पोलिसांनी आत जाऊ दिलं नाही. त्याआधी कन्हैयाकुमारने रोहित वेमुला च्या कुटुंबियांची भेट घेतली. देशद्रोहाच्या आरोप प्रकरणी कन्हैयाकुमार सध्या जामिनावर बाहेर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2016 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close