S M L

राष्ट्रवादीसाठी अडचणीचे अधिवेशन

अमेय तिरोडकर, मुंबईया बजेट अधिवेशनातील अनेक मुद्दे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसाठी अडचणीचे ठरणार आहेत. त्यातच सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये सुसंवाद नसल्याने पक्ष सभागृहात एकाकी पडण्याची शक्यता आहे. सभागृहात राष्ट्रवादीची यावेळी कसोटी लागणार आहे. कारण अधिवेशनातले चर्चेचे अनेक मुद्दे हे राष्ट्रवादीकडच्या खात्यांबद्दलचेच आहेत. सगळ्यात मोठा मुद्दा गृहखात्याचा... पुणे बॉम्बस्फोटाचा तपास अजूनही लागलेला नाही. वसईत पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. गृहमंत्री आहेत राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील. दुसरा मुद्दा महागाईचा. रेशनवर धान्य मिळत नाही. आम जनता महागाईनं हैराण आहे. हे खाते आहे, राष्ट्रवादीच्याच अनिल देशमुखांकडे. तिसरा मुद्दा लोडशेडिंगचा... ग्रामीण भागात लोडशेडिंगमुळे शेताला पाणी नाही, घरात चौदा चौदा तास वीज नाही, असा आरोप विरोधक करत आहे. हे खाते आहे, राष्ट्रवादीचे युवराज म्हटले जाणार्‍या अजित पवारांकडे. सरकार जेरीस येईल असे हे मुद्दे. त्यामुळेच राष्ट्रवादी आता विरोधकांच्या हल्ल्याला तोंड देण्याच्या तयारीला लागला आहे. सभागृहात सरकार म्हणून काँग्रेसचे नेते सोबत राहतील असे त्यांना वाटते. पण सरकारमधील या दोन्ही पक्षांमध्ये सध्या सगळे काही आलबेल नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी आपल्या नेत्यांच्या बचावासाठी कुठलीही कसर ठेवू इच्छित नाही. आपल्या मंत्र्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे शक्य तेवढे सगळे प्रयत्न पक्ष करत आहे. पण, सगळे मोठे नेते त्यासाठी मनाने एकत्र येण्याची गरज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2010 11:11 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2010 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close