S M L

कोलकाता फ्लायओव्हर दुर्घटनाप्रकरणी 'आयव्हीआरसीएल'च्या 7 अधिकार्‍यांना अटक

Samruddha Bhambure | Updated On: Apr 1, 2016 09:35 PM IST

कोलकाता फ्लायओव्हर दुर्घटनाप्रकरणी 'आयव्हीआरसीएल'च्या 7 अधिकार्‍यांना अटक

कोलकाता - 01 एप्रिल : फ्लायओव्हर कोसळून झालेल्या अपघातात 24 जणांचा मृत्यू झाला आहे तर 80हून अधिक जखमी झालेत. या प्रकरणी फ्लायओव्हर बनवणार्‍या आयव्हीआरसीएल या कंपनीच्या 7 अधिकार्‍यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

कोलकात्यामध्ये गरीश पार्क परिसरात काल (गुरूवारी) बांधकाम सुरू पूल किोसळला. त्यानंतर ढिगारा उपसण्याचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी कोलकाता पोलिसांचे 5 सदस्यीय पथक हैदराबादमध्ये दाखल झालं आहे. हैदराबादमध्ये हे पथक कोलकात्यातील फ्लायओव्हर बनवणार्‍या आयव्हीआरसीएल कंपनीवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून या कंपनीच्या अधिकार्‍यांची चौकशी सुरू आहे.

दुसरीकडे हा एक केवळ अपघात असून यांत कंपनीची चूक नसल्याचे आयव्हीआरसीएल कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही दुर्घटना म्हणजे एक्ट ऑफ गॉड असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. मात्र हा केवळ शब्दप्रयोग असल्याची सारवासारव आता कंपनीकडून करण्यात येत आहे. या दुर्घटनेमागे अन्य काही कारणं असू शकतात असंही कंपनीने म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणी कलकत्ता हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2016 07:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close