S M L

अमिताभ बच्चन, ऐश्वर्यासह 500 भारतीय करबुडवे, पनामा पेपर लीक

Sachin Salve | Updated On: Apr 4, 2016 07:41 PM IST

अमिताभ बच्चन, ऐश्वर्यासह 500 भारतीय करबुडवे, पनामा पेपर लीक

panama204 एप्रिल : जगभरातील नामवंतांनी आणि सेलिब्रिटींनी करचुकवेगिरीसाठी परदेशात गोपनीयपणे कंपन्या स्थापन केल्या आहेत. या करचुकवेगिर्‍यांची यादीच 'इंडियन एक्सप्रेस'नं उघड केली आहे. या यादीत बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन, त्यांची सून ऐश्वर्या राय-बच्चन, डीएलएफचे मालक के.पी सिंह, अंडर वर्ल्ड डॉन इक्बाल मिरची अशा जवळपास 500 भारतीयांचा या यादीत समावेश आहे.

पनामामधील लमोझॅक फॉन्सेका या कायदेविषयक फर्मकडील सुमारे एक कोटी दहा लाख दस्तावेजांचा आठ महिने शोध घेऊन ही यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत जगभरातील नामवंत राजकारण्यांपासून खेळाडूंचीही नावं आहेत. या यादीत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचं कुटुंबीय यांचाही समावेश आहे. तसंच रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि त्यांचे सहकारी यांचंही नाव समोर आलंय.एवढंच नाहीतर फुटबॉलस्टार लिओनेल मेस्सी, युएफाचे माजी प्रमुख मायकल प्लॅटिनी यांचाही समावेश आहे.

इंटरनॅशनल कन्सालॉर्टिअम ऑफ इन्व्हस्टिगेशन जर्नलिस्ट (आयसीआयजे) या संघटनेनं पनामा पेपर नावाने कराची थकबाकी ठेवणार्‍यांची माहिती जाहीर केलीये. पनामा पेपरमध्ये तब्बल 1 कोटी 10 लाख कागदपत्रे आहेत. जगभरातील 100 पत्रकारांनी एकत्र येऊन या प्रकरणाचे ठोस पुरावे एकत्र केल्याचा दावा आयसीआयजेने केलाय. यासाठी 70 देशांतील 370 अहवालांचा संदर्भ घेण्यात आलाय. कर थकवणार्‍यांच्या यादीत जगभरातील 140 राजकीय नेते, सेलिब्रिटींचा समावेश आहे. जर्मनीतील एका दैनिकाने या प्रकरणाचा गौप्यस्फोट केलाय. हा प्रकार जाहीर केल्यानंतर एडवर्ड स्नोडेनने ट्विटकरून हा पत्रकारीतेतील सर्वात मोठी घटना असल्याचं मत व्यक्त केलंय. कर थकवणे हा एका प्रकारचा भ्रष्टाचार असल्याचं मत एडवर्ड स्नोडेनने व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 4, 2016 07:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close