S M L

बच्चू कडू यांचं दिल्लीतलं आंदोलन मागे

Sachin Salve | Updated On: Apr 4, 2016 09:09 PM IST

बच्चू कडू यांचं दिल्लीतलं आंदोलन मागे

04 एप्रिल : गेल्या 2 दिवासांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू यांचं 5 हजार अपंगांसोबत दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. पुढच्या सहा महिन्यात सगळ्या मागण्यांवर चर्चा करुन तोडगा काढू असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री कृष्णपाल गुजर यांनी आश्वासन दिलंय.

केंद्रसरकारचे विविध खात्याचे सचिव स्तरावरील अधिकारी कडू यांच्यासोबत चर्चा करत होते आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आज सकाळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री कृष्णपाल गुजर यांच्या दालनत 3-4 तास या आंदोलनावर चर्चा झाली. सहा महिन्यात यासगळ्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिलं आहे. सोबतच हिंदु महासभेच्या भवनात खुद्द मंत्र्यांनीच येऊन अपंगांना आश्वासन दिलं आहे. त्यांच्या या आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 4, 2016 09:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close