S M L

दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला फटकारलं

Samruddha Bhambure | Updated On: Apr 7, 2016 01:51 PM IST

Supreme court of india

07 एप्रिल :  देशातील नऊ राज्य दुष्काळानं होरपळत असल्याच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला चांगलेच फटकारलं आहे.

देशातल्या नऊ राज्यांमध्ये दुष्काळ पडला असताना, तुम्ही डोळेझाक करू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावलं आहे. तसंच या दुष्काळावर मात करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचला, असं ही कोर्टोने सरकारला खडसावलं आहे.

एवढंच नाही तर केंद्र सरकारकला गुरुवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही कोर्टाने केंद्र सरकारला दिलं आहेत. यामध्ये दुष्काळी भागात मनरेगा योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने सुरू आहे आणि अशा राज्यांना केंद्र सरकार काय मदत करत आहे, याबाबतची माहिती द्यावी लागणार आहे.

सध्या देशातली नऊ राज्यं दुष्काळाचा सामना करत आहेत. त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. स्वराज अभियान या एनजीओने सुप्रीम कोर्टात याबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. दुष्काळी शेतकर्‍यांना मदत आणि त्यांचे पुनर्वसन करावं, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 7, 2016 01:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close