S M L

संघाच्या विचारधारेसमोर कधी झुकणार नाही - राहुल गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Apr 11, 2016 10:00 PM IST

rahul gandhiaw

नागपूर – 11 एप्रिल :  संविधानाच्या माध्यमातून काँग्रेस आणि डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीच्या विरोधात लढा दिला, परंतु आजही मनूचा विचार देशात जिवंत असल्याचं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर टीका केली आहे. संघ हा मनुवादाचे समर्थन करतो त्यामुळे त्यांच्यासमोर मी कधीही झुकणार नाही, कोणाला झुकू देणार नाही, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेसनं आयोजन केलेल्या सभेत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

कस्तुचंद पार्कमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं असून, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आदी ज्येष्ठ नेते यासभेला उपस्थित आहेत. राहुल गांधी आज नागपुरात मुक्काम करणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी दशेत यातना सहन कराव्या लागल्या, यावेळी राहुल गांधी संघ आणि भाजपलाही लक्ष्य केलं आहे. रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे तर बलिदान असल्याचं बोलत भाजपला टोमणा मारला आहे. तसंच काँग्रेस गरीब, कमकुवत, अल्पसंख्यांचं रक्षण करेल, अशी ग्वाही राहुल गांधींनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2016 10:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close