S M L

एका बाईकवेडीचा करुण अंत, वीणू पालीवालांचा अपघाती मृत्यू

Sachin Salve | Updated On: Apr 12, 2016 05:02 PM IST

एका बाईकवेडीचा करुण अंत, वीणू पालीवालांचा अपघाती मृत्यू

12 एप्रिल : 180 च्या स्पीडने बाईक चालवून भल्याभल्यांना घाम फोडणार्‍यांना वीनू पालीवाल यांनी अकाली एक्झिट घेतलीय. भारत भ्रमणावर निघालेल्या बाईकवेड्या वीनू पालीवाल यांचा अपघातात दुदैर्वी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. ज्या हार्ले डेव्हिडसनवर जीवापाड प्रेम केलं त्याच बाईकने शेवटी घात केलाय.

भारतातील प्रसिद्ध मोटरसायकलस्वार वीनू पालीवाल यांचा अपघातात मृत्यू झालाय. सोमवारी मध्य प्रदेशातल्या विदिशा जिल्ह्यातल्या ग्यारसपुरमध्ये त्यांच्या हार्ले डेव्हिडसन या गाडीला अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना ग्यारसपुरच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना विदिशाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. वीनू आणि त्यांचा साथीदार दिपेश हे हार्ले डेव्हिडसनवर भारत भ्रमणासाठी निघाले होते.

वीणू यांच्या अपघातामुळे तीचे वडील कैलाशतचंद्र यांना धक्का बसला. हार्ले डेव्हिडसनसारख्या गाडीवर वीणूचं चांगलं नियंत्रण होतं. तसं बघ्याला गेलं तर भारतीय रस्ते वेगवान वाहनांसाठी अनुकूल नाही. त्यामुळे अनेक वेळा तिला सावकाश बाईक चालवण्याचा सल्ला द्यायचो पण अखेर जे नाही घडायचं तेच घडलं असं दुख त्यांनी व्यक्त केलं. मी, एक मुलगी नाहीतर एक मुलगा गमावलाय. वीणूही इतर महिलांसाठी प्रेरणा होती अशी भावनाही त्यांनी व्यक्त केलं.

विशेष म्हणजे वीणू यांनी भारत भ्रमणावर 'ये है इंडिया' सिनेमा बनवायचा होता. पण, आता हे स्वप्न आता अपूर्ण राहिलंय. वीणू यांना बाईक चालवण्याचा तरुण वयापासून छंद होता. सुरुवातील त्यांनी 150 सीसी बाईक चालवण्यास सुरुवात केली. नंतर रॉयल एन्फिलड आणि त्यानंतर त्यांनी एका मित्राकडे हार्ले डेव्हिडसन 48 हे मॉडेल पाहिलं. त्यानंतर हेच मॉडेल विकत घेतलं. मागील वर्षी या हार्ले डेव्हिडसनवर स्वार होतं त्यांनी हॉगची रॅली पूर्ण केली होती. त्यामुळे त्यांना लेडी ऑफ द हॉर्ले 2016 चा किताबही प्रदान करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2016 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close