S M L

डोन्ट वरी, आता पीएफची संपूर्ण रक्कम काढता येणार !

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2016 06:40 PM IST

डोन्ट वरी, आता पीएफची संपूर्ण रक्कम काढता येणार !

19 एप्रिल : मुलांचं शिक्षण असो किंवा लग्न...पैशांची गरज सर्वांनाच भासते खासकरून कर्मचार्‍यांना अशा वेळी पैशांची जुळवाजुळव करताना चांगलीच दमछाक होते. पण, आता केंद्र सरकारने कर्मचार्‍यांना दिलासा दिला असून पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीतून सर्व रक्कम कधीही काढता येणार आहे. येत्या ऑगस्टपासून याचा फायदा सर्व कर्मचार्‍यांना घेता येणार आहे.

कामगार मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी संदर्भात काही अटी शिथील केल्या होत्या. त्यामुळे आता वैद्यकीय उपचाराच्या खर्चासाठी, लग्नाच्या खर्चासाठी आणि मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी पीएफची संपूर्ण रक्कम खात्यातून काढता येणार आहे. 30 एप्रिलला पीएफच्या नियमावलीची अंतिम तारीख होती. 1 मेपासून नवे नियम लागू होणार होते.

त्या नियमानुसार कर्मचार्‍यांना सर्व रक्कम काढायची असेल तर वयाच्या 58 वर्षांनंतर ही रक्कम काढता येणार होती. पण, याला विरोध झाल्यामुळे केंद्राने हा प्रस्ताव मागे घेतला. त्यामुळे ऑगस्टनंतर पीएफ खात्यातून संपूर्ण रक्कम काढता येणार आहे असं कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितलं. पीएफवर असलेल्या नियमानुसार सध्यपरिस्थितीत कोणत्याही कर्मचार्‍याने नोकरी सोडल्यानंतर 2 महिने जर तो बेरोजगार राहिला तर त्याला संपूर्ण पीएफ काढण्याचा अधिकार आहे. जर कर्मचारी नोकरी करत असेल तर पीएफ काढण्यासाठी त्याला 58 वर्षांपर्यंत वाट पाहावी लागत होती. आता नव्या नियमावलीनुसार कर्मचार्‍यांना पीएफ काढता येणार आहे.

यासाठी काढता येईल पीएफ

- घरबांधणी किंवा घरखरेदी

- गंभीर आजारांवर उपचार

- लग्न

- मुलांचं उच्च शिक्षण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2016 06:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close