S M L

हायकोर्टाचा मोदी सरकारला दणका, उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट हटवली

Sachin Salve | Updated On: Apr 21, 2016 05:05 PM IST

हायकोर्टाचा मोदी सरकारला दणका, उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट हटवली

21 एप्रिल : उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय नैनिताल हायकोर्टाने घेतला आहे. त्यामुळे मोदी सरकारला हायकोर्टाने चांगलाचं दणका दिलाय. विधानसभेत आता 29 एप्रिला विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे. मोदी सरकार या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतं.

शासकीय यंत्रणा विस्कळीत झाल्याच्या कारणावरून मोदी सरकारने उत्तराखंडमध्ये 27 मार्च रोजी राष्ट्रपती राजवट लागू केली होती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 नुसार यासंदर्भातील जाहीर घोषणेवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार हरीश रावत प्रणित सरकार बरखास्त करून विधानसभा निलंबित करण्यात आली होती. आता नैनिताल हायकोर्टाने मोदी सरकारला दणका देत राष्ट्रपती राजवट हटवली आहे. नैनिताल हायकोर्टाच्या या निर्णयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मात्र एकच जल्लोष केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2016 04:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close