S M L

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरुन राज्यसभेत गदारोळ

Sachin Salve | Updated On: Apr 27, 2016 01:16 PM IST

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरुन राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली - 27 एप्रिल : राज्यसभेमध्ये आज सत्ताधारी भाजपनं ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यावरून काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना लक्ष्य केलं. कालच राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतलेले खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करताना सोनिया गांधी यांचं नाव घेतलं. त्यामुळे काँग्रेसचे सदस्य संतापले आणि सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यानंतर राज्यसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं.

काँग्रेसनंही ऑगस्टा प्रकरणावर काँग्रेसनं चर्चेसाठी नोटीस दिली आहे. सुब्रमण्यम स्वामी हे भाजपतर्फे निवडून आलेले नाहीत. त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींमार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसभेत स्वामींनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली तरी भाजपला नामानिराळं राहण्याची सोय आहे. या घोटाळ्यात सोनिया गांधींनी 3600 कोटींची लाच घेतली असा भाजपचा आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2016 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close