S M L

कुणालाही घाबरत नाही, 'ऑगस्टा' प्रकरणाची चौकशी करा -सोनिया गांधी

Sachin Salve | Updated On: Apr 27, 2016 02:17 PM IST

27 एप्रिल : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखेर मौन सोडलं आहे. मी कुणाला घाबरत नाही, माझ्याकडे लपवण्यासारखंही काही नाही. भाजप सरकार दोन वर्षांपासून सत्तेत आहे त्यांनी चौकशी करावी, जेणेकरून सत्य सगळ्यासमोर येऊ द्या असं आव्हानच सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला दिलंय. तसंच भाजपला माझं नाव घेऊ द्या, आपण कोणतही चुकीचं काम केलं नाही असंही त्यांनी यावेळी बजावलं.sonia gandhi_national

या प्रकरणावर सोनिया गांधी यांनी तातडीची बैठक बोलावलीये. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे, आनंद शर्मा यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी इटलीमधल्या एका खटल्याच्या निकालामध्ये सोनियांसह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनियांचे सल्लागार अहमद पटेल, ऑस्कर फर्नांडिस यांची नावं आलीयेत. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून व्हीआयपींसाठी हेलिकॉप्टर खरेदीचा हा व्यवहार झाला होता. माजी हवाईदल प्रमुख एस.पी.त्यागी यांना सव्वाशे कोटी रुपयांची लाच दिल्याचा दावा यात करण्यात आलाय.

काय आहे ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण?

- यूपीए सरकारच्या काळात 2010 मध्ये व्हीआयपींसाठी 12 हेलिकॉप्टर खरेदीचा करार

- 3 हजार 600 कोटींचा करार झाला होता

- या करारामध्ये 10 टक्के लाच दिल्याचा आरोप

- करारानुसार 3 हेलिकॉप्टर भारताला मिळाले

- तीनही हेलिकॉप्टर सध्या धूळखात पडून

- भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर कंपनीशी झालेला करार रद्द

- घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन वायुदल प्रमुख एस.पी. त्यागी यांच्यासह 13 लोकांविरूद्ध गुन्हा दाखल

आता का होतेय चर्चा?

- इटलीच्या मिलान कोर्टात सुरू होतं भ्रष्टाचाराचं प्रकरण

- कोर्टाच्या निकालात भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट

- घोटाळ्यात एस. पी. त्यागींचा सहभाग असल्याचा ठपका

- कोर्ट निकालात सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांचाही उल्लेख

- मात्र सोनिया, मनमोहन सिंहांच्या भूमिकेबाबत स्पष्टता नाही

- 225 कोटींची लाच दिल्याचा आरोप

- लाच दिलेल्या रकमेपैकी 52 टक्के हिस्सा नेत्यांना मिळाला?

- 28 टक्के हिस्सा अधिकार्‍यांना मिळाला ?

- 20 टक्के हिस्सा वायुदल अधिकार्‍यांना मिळाल्याचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2016 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close