S M L

रेल्वेच्या जागेत आश्रम

रोहिणी गोसावी, मुंबई24 मार्चरेल्वेच्या जागेवर अतिक्रमण झालेले आपण नेहमी पाहतो. पण जोगेश्वरीत चक्क एका रेल्वे कर्मचार्‍यानेच रेल्वेच्या जागेत आश्रम आणि सत्संग सुरू केला आहे. वेस्टर्न रेल्वे कॉलनीत राहणार्‍या जे. बी. यादव उर्फ ब्रम्हश्री देवराह भरतजी महाराज यांनीच हा प्रकार केला आहे. यासाठी वापण्यात येणारी वीज ही बेकादेशीररित्या घेतली जाते. याच वीजेचा धक्का लागून फेब्रुवारीत एका 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता.जे. बी. यादव उर्फ ब्रम्हश्री श्री देवराह भरतजी महाराज हे वेस्टर्न रेल्वेत, एका मोठ्या पदावर काम करतात. ते जोगेश्वरी रेल्वे कॉलनीत राहतात. या घरालाच त्यांनी आश्रमाचे रूप दिले आहे. रेल्वेच्या नियमाप्रमाणे फक्त रेल्वेत काम करणारी व्यक्तीच या ठिकाणी राहू शकते. पण त्यांच्या या आश्रमात त्यांचे अनुयायीही बिनधास्तपणे राहतात. एवढेच नाही तर याठिकाणी गाई म्हशींसाठी महाराजांनी गोठाही बांधला आहे. या ठिकाणी आता या महाराजांचा नवरात्रीचा महायज्ञ सुरू आहे. तोही बेकायदेशीरपणे. रेल्वेने त्यांना दिलेली परवानगी स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर रद्द केली आहे. तरीही हा यज्ञ सुरूच आहे. मुलाच्या मृत्यूनंतर वीजेच्या खांबांवरचे उघडे बॉक्स बंद करण्यात आले आहेत. एकूणच रेल्वे प्रशासन या महाराजांना पाठीशी घालताना दिसत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2010 11:25 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2010 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close