S M L

उद्या 'नीट' परीक्षा द्याच, विद्यार्थ्यांची याचिका कोर्टाने फेटाळली

Sachin Salve | Updated On: Apr 30, 2016 03:04 PM IST

neet_exam 30 एप्रिल : मेडिकल प्रवेशासाठी नीट परीक्षा उद्या (रविवारी)च होणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय. परीक्षा पुढे ढकलण्यात अशी विद्यार्थ्यांचा याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलीये.

सुप्रीम कोर्टाने दोन दिवसांपूर्वी मेडिकल प्रवेशासाठी आधी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट ) घेण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थी आणि पालकांनी विरोधात दर्शवला. या विरोधात काही विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने ही याचिका आज फेटाळली. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे उद्या नीटची परीक्षा होणारच, यावर शिक्कामोर्तब झाले.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच 'नीट' घेतली जावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता. याविरोधात केंद्र आणि राज्य सरकारांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकांवर सुनावणी घेण्यासही कोर्टाने शुक्रवारी नकार दिला होता. आता विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवरही कोर्टाने सुनावणी घेण्यास नकार दिला. दरम्यान, राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2016 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close