S M L

'नीट'विरोधात राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात धाव

Sachin Salve | Updated On: May 2, 2016 01:32 PM IST

'नीट'विरोधात राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात धाव

दिल्ली - 02 मे : 'नीट' परीक्षेच्या विरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून राज्य सरकारची स्वतंत्र फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायलयाने स्विकारली आहे. तसंच महाराष्ट्र सरकारसह इतर 8 राज्यांनीही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

मेडिकल प्रवेशासाठी सुप्रीम कोर्टाने 'नीट' राष्ट्रीय पात्रता परीक्षा लागू केलीये. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. देशभरातील विद्यार्थ्यांनी या विरोधात आंदोलनं केलीये. तसंच नीट पुढे ढकलण्यात यावी विद्यार्थ्यांनी केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने शनिवारी फेटाळली होती. त्यामुळे आदेशाप्रमाणे 1 मे रोजी देशभरात नीटच्या परीक्षेचा पहिला टप्पा पार पडला. मात्र, सुप्रीम कोर्टाचा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीये. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना साथ देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान, दुसर्‍या टप्प्यातील नीट परीक्षा 24 जुलै रोजी होणार आहे. आता राज्य सरकारने याचिका दाखल केली असून उद्या त्यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2016 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close