S M L

'नीट'बाबत राज्य सरकारची आज सुप्रीम कोर्टात 'परीक्षा'

Sachin Salve | Updated On: May 3, 2016 09:09 AM IST

neet_exam03 मे : मेडिकल प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा 'नीट' परीक्षेविरोधातली सुनावणी आज (मंगळवारी) होणार आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भातल्या याचिका दाखल करुन घेतल्या. महाराष्ट्रासह एकूण 8 राज्यांनी या नीट परीक्षेला आणि त्याच्या तात्काळ अंमलबजावणीला विरोध दर्शवला आहे.

त्यामुळे कोर्टात नीट परीक्षेचा निकाल काय लागणार, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमधली धाकधूक मात्र कायम आहे. याआधीही सुप्रीम कोर्टाने केंद्रासह पालक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वतंत्र पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत.

यापूर्वी विद्यार्थ्यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी फेटाळली होती. त्यामुळे रविवारी देशभरात नीटच्या परीक्षेचा पहिला टप्पा पार पडला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीये. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना साथ देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.दरम्यान,दुसर्‍या टप्प्यातील नीट परीक्षा 24 जुलै रोजी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2016 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close