S M L

'नीट'बाबत आता गुरुवारी होणार सुनावणी

Samruddha Bhambure | Updated On: May 3, 2016 06:09 PM IST

'नीट'बाबत आता गुरुवारी होणार सुनावणी

 

03 मे : मेडिकल प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा 'नीट' परीक्षेविरोधातली सुनावणी आता गुरूवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. काल सुप्रीम कोर्टानं यासंदर्भातल्या याचिका दाखल करुन घेतली होती. महाराष्ट्रासह एकूण 8 राज्यांनी या नीट परीक्षेला आणि त्याच्या तात्काळ अंमलबजावणीला विरोध दर्शवला आहे.

नीटची अंमलबजावणी 2018 पासून करण्यात यावी आणि सध्या राज्य सरकारांना स्वतंत्रपणे मेडिकलचे प्रवेश सीईटीच्या आधारे घेण्याची परवागी द्यावी, अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालावर देशातल्या 18 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे कोर्टात नीट परीक्षेचा निकाल काय लागणार, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमधली धाकधूक मात्र कायम आहे.

यापूर्वी विद्यार्थ्यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी फेटाळली होती. त्यामुळे रविवारी देशभरात नीटच्या परीक्षेचा पहिला टप्पा पार पडला. मात्र, सुप्रीम कोर्टाचा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना साथ देत सुप्रीम कोर्टाने धाव घेतली आहे.

दरम्यान,दुसर्‍या टप्प्यातील नीट परीक्षा 24 जुलै रोजी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2016 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close