S M L

काँग्रेसने राज्यातल्या महामंडळांच्या नेमणुका जाहीर केल्या

काल काँग्रेसने राज्यातल्या आपल्या वाट्याच्या महामंडळांच्या नेमणुका जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या दिल्लीमध्ये पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संमतीने जाहीर झाल्यात. या नियुक्त्या व्हाव्यात यासाठी गेले अनेक दिवस कॉंग्रेसमध्ये पक्षांतर्गत मागणी होत होती. महामंडळावर नियुक्त केलेल्या यादीवरही मुख्यमंत्री विलासराव देशमुख समर्थकांचं वर्चस्व राहीलं आहे.कृष्णा खोरे महामंडळावर आनंदराव पाटील यांची नेमणूक झाली आहे. तर, मुंबई झोपडपट्टी विकास महामंडळावर वेल्लूस्वामी नायडू यांची नेमणूक झाली आहे. महाराष्ट्र सामाजिक आणि एकात्मता महामंडळावर पत्रकार मधुकर भावे यांची नेमणूक झाली आहे.राज्यातील आगामी निवडणुका पाहता या नेमणुका झाल्याचं कॉंग्रेसमध्ये म्हटलं जातं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2008 02:32 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2008 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close