S M L

मोदी सरकारमुळे लोकशाही धोक्यात -सोनिया गांधी

Sachin Salve | Updated On: May 6, 2016 12:24 PM IST

दिल्ली - 06 मे : मोदी सरकारच्या काळात देशाची लोकशाही धोक्यात आली आहे असा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केलाय. सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे दिग्गज नेते दिल्लीत जंतरमंतर ते संसद भवन रॅली काढलीये. ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर गैरव्यवहार, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या विरोधात काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरलले. जंतरमंतर मैदानापासून सुरू झालेली रॅली संसद भवनपर्यंत पोहोचली असून तिथे सोनिया गांधी यांच्यास मनमोहन सिंग, राहुल गांधींसह दिग्गज नेते स्वत:ला पोलिसांच्या स्वाधिन करणार आहे.

32sonia_on_modiजंतरमंतरवर झालेल्या सभेत सोनिया गांधी, मनमोहन सिंह आणि राहुल गांधींनी मोदी सरकारवर घणाघात केला. मोदी सरकारची भूख आता वाढत चालली आहे. जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे। तिथे पैशाच्या बळावर सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपले अपयश छाकण्यासाठी मोदी सरकार आमच्यावर खोटे आरोप करत आहे. पण, आयुष्याने मला संघर्ष करण्याचं शिकवलंय. काँग्रेसला तर तुम्ही कमजोर समजू नका. आम्ही कधीच या सरकारपुढे झुकणार नाही अशा शब्दात सोनियांनी मोदी सरकारला सुनावलं. तसंच दोन वर्षांत मोदी सरकारने उलथापालथ केलीये. कुणावरही देशद्रोहाचा आरोप केला जातोय. समाज धर्म आणि भाषेच्या नावावर वाटला जात आहे असा आरोपही सोनियांनी केला.

तर, देशात फक्त मोदी आणि मोहन भागवत यांचं म्हणणं ऐकलं जातंय. उत्तराखडंमध्ये सरकार पाडून लोकशाहीची हत्या करण्यात आलीये. मोदी सरकारकडून कायदे पायदळी तुडवले जात आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसंच राहुल यांनी मेक इन इंडियावरही जोरदार टीका केली. मेक इन इंडिया अंतर्गत दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकर्‍या मिळतील असा दावा मोदींनी केला होता. पण, मागील वर्षी 1.3 लाख लोकांनाच रोजगार मिळालाय. देशात अनेक ठिकाणी दुष्काळ पडलाय पण, मोदींचं याकडे साफ दुर्लक्ष आहे अशी टीकाही राहुल गांधींनी केली.

मनमोहन सिंह यांनीही मोदी सरकारवर सडकून टीका केली. काँग्रेस हा देशाचा आत्मा आहे. मोदी सरकारचं लक्ष्य देशातील समस्या दूर करण्याकडे नसून भारत काँग्रेसमुक्त करण्याकडे आहे. पण, अनेक ठिकाणी काँग्रेसला संपवण्याचं काम मोदी सरकार करतंय. पण, आम्ही मोदींचे मनसुबे उधळून लावू असा इशारा मनमोहन सिंग यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2016 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close