S M L

'नीट' आभ्यास करण्यास केंद्राने मागितला कोर्टाकडे वेळ

Samruddha Bhambure | Updated On: May 6, 2016 07:20 PM IST

'नीट' आभ्यास करण्यास केंद्राने मागितला कोर्टाकडे वेळ

  06 मे :  नॅशनल एलिजिबीटी टेस्ट अर्थात 'नीट'संदर्भात सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातल्या 4 लाख विद्यार्थ्यांना तात्पुरता मोठा दिलासा दिला आहे. कोर्टात सुनावणीच्या वेळी केंद्रानं कोर्टाकडे हा विषय सोडवण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. कोर्टाने केंद्र सरकराची ही मागणी मान्य करत, सोमवारपर्यंतचा वेळ दिला आहे.

तसंच सुनावणी संपवताना कोर्टानंही केंद्राचं मत असेल, तर राज्यांना आम्ही नीटमधून वगळू, मात्र खासगी कॉलेजेस, संस्थांना कुठल्याही परिस्थितीत ही सवलत देणार नाही असं म्हटलंय. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी दोन दिवसात केंद्र आणि राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांची बैठक बोलावली असल्याची माहितीही यावेळी सरकारी वकिलांनी कोर्टाला दिली.  त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता सोमवार पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

महाराष्ट्रासह एकूण 8 राज्यांनी या नीट परीक्षेला आणि त्याच्या तात्काळ अंमलबजावणीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे कोर्टात नीट परीक्षेचा निकाल काय लागणार, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक आहे.

मेडिकल प्रवेशासाठी संपूर्ण देशात एकच परीक्षा असावी, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. मात्र, ती परीक्षा यंदापासून लागू करावी, असंही कोर्टानं म्हटल्यानं ऐनवेळेस विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मोठी धावपळ होणार आहे.

महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, जम्मू-काश्मीर या राज्यांसह काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी 'नीट' परीक्षेसंबंधीच्या आदेशात फेरबदल करण्यासाठी याचिका केल्या आहेत. दरम्यान, राज्यात आज 4 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी एमएचटीसीटीची परीक्षा दिल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2016 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close