S M L

आत्महत्याग्रस्त भागात सिंचनासाठी10 हजार कोटींची केंद्राकडे मागणी

Sachin Salve | Updated On: May 7, 2016 07:52 PM IST

आत्महत्याग्रस्त भागात सिंचनासाठी10 हजार कोटींची केंद्राकडे मागणी

07 मे : राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावर त्यांनी पंतप्रधानांसमोर एक सादरीकरण केलं. आत्महत्याग्रस्त भागात सिंचनासाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींची भरीव मागणी केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्यातल्या दुष्काळाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून घेतलं होतं. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाची माहिती सांगत असतानाच राज्याला सिंचन प्रकल्पासाठी लागणार्‍या निधीची मागणी प्रस्तावातून केली. पण हा दुष्काळ मानवनिर्मित आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या पद्धतीनं सांगितलं.

मुख्यमंत्री केवळ अधिकार्‍यांना घेऊन पंतप्रधानांना भेटले,पण त्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेऊन पंतप्रधानांशी चर्चा करायला हवी होती, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. राज्यातल्या दुष्काळाबाबत सरकार दीर्घकालीन उपाययोजना करताना दिसत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

पंतप्रधानांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, पण त्यातून शेतकर्‍यांच्या पदरात काय पडलं. केवळ आश्वासनं देऊन चालणार नाही, तर तातडीची मदत शेतकर्‍यांना करणं गरजेचं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय.खरंतर दुष्काळाच्या बाबतीत सर्वपक्षीय राजकारण होण्यापेक्षा दुष्काळ निर्मुलनासाठी एकत्रित प्रयत्न होण्याची गरज आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे

- केंद्र सरकारकडून चांगला सहयोग मिळतोय

-सप्लीमेंटरी मेमोरंडम सादर केला जाईल

- सहा आठवडयाचा प्लॅन तयार केला आहे.

- ज्वाईंट अँक्शन प्लॅन केला आहे.

- शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्लॅन मांडला

- मान्सूनवरचा अवलंबित्व कमी करण्याचा कार्यक्रम आखला जाईल

- जलयुक्त शिवार योजनामधून जलसंचय करायचा

- आयडब्ल्यूएपीमधून जादा पैसे द्यावे

- शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात सिंचन प्रकल्पासाठी 7 हजार कोटी द्यावे

- त्याशिवाय अडीच हजार कोटीच दुष्काळग्रस्तासाठी पँकेज द्यावं

- 45 टक्के शेतकरी कर्ज घेतात. उर्वरित शेतकरी क्रेडीट सिस्टिममध्ये आले नाहीत

- वर्ल्ड बँकेकडे 4 हजार कोटीची मागणी केली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2016 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close