S M L

'नीट' द्यावीच लागेल, राज्यात 'सीईटी'ही रद्द

Sachin Salve | Updated On: May 9, 2016 10:51 PM IST

neet_exam_309 मे : मेडिकल प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) न घेण्याबाबत राज्य सरकारने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत नीट परीक्षा द्यावीच लागेल असा अंतरिम आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय. तसंच राज्य सरकारला वेगळी सीईटी घेण्यास कोर्टाने मनाई केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 'नीट' द्यावीच लागणार आहे.

सुप्रीम कोर्टाने नीट परीक्षा कायम केली. त्यामुळे 1 मे रोजी नीटची पहिली परीक्षाही पार पडली. पण, मेडिकल प्रवेशसाठी नीट नको त्यापेक्षा राज्यात सीईटी घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली. याबद्दल याचिकाही दाखल केली पण सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली. महाराष्ट्र सरकारसह देशातील इतर 9 राज्यांनी नीटबद्दल फेरविचार याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने याचिका स्विकारल्यामुळे विद्यार्थ्यांना आशेचा किरण दिसत होता. पण, आज सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावल्यामुळे नीटला पर्याय नाही हे स्पष्ट केलं. मेरट नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळलीये. ज्या विद्यार्थ्यांनी 1 मे रोजी नीटची परीक्षा दिली ते 24 जुलैला होणारी नीटची परीक्षा पुन्हा देऊ शकतील. पण त्यांचे पूर्वीचे मार्क ग्राह्य धरले जाणार नाही. तसंच ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीची परीक्षा दिली होती. त्या विद्यार्थ्यांना देखील 24 जुलैला नीटची परीक्षा द्यावी लागणार आहे असे आदेशही कोर्टाने दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा द्यावी लागणार असून 24 जुलैपर्यंत अभ्यास करण्याची संधी आहे.

कोर्टाने दिलेला निकाल नेमका काय आहे ?

1. नीटची पहिली परीक्षा ज्यांनी दिली नाही त्यांना नीट-2 देता येणार

2. नीट-1 ज्यांनी दिलीय पण तयारी कमी पडली असं ज्यांना वाटतं ते नीट-2 देऊ शकतात.

3. नीट-1 देऊनही नीट-2 देऊ इच्छिणार्‍यांना पहिल्या परीक्षेची उमेदवारी सोडावी लागणार

4. कोणत्याही राज्याला एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेता येणार नाही

5. नीटची परीक्षा अल्पसंख्याकांच्या हक्कांना किंवा आरक्षणाला धक्का पोहोचवत नसल्याचं सुप्रीम कोर्टाचं मत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2016 09:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close