S M L

युपीएससीमध्ये दिल्लीची टीना दाबी देशात पहिली, योगेश कुंभेजकर राज्यात पहिला !

Sachin Salve | Updated On: May 10, 2016 06:37 PM IST

युपीएससीमध्ये दिल्लीची टीना दाबी देशात पहिली, योगेश कुंभेजकर राज्यात पहिला !

10 मे : संघ लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. योगेश कुंभेजकर महाराष्ट्रातून पहिला तर देशातून आठवा आला आहे. देशातून पहिला येण्याचा मान दिल्लीच्या टीना दाबी या विद्यार्थिनीने मिळवला आहे. तर हनुमंत झेंडगे हा देशात 50 वा आणि महाराष्ट्रातून दुसरा आला आहे.

महाराष्ट्रात तिसरा क्रमांक विष्णू महाजनने मिळवलाय. त्याचा देशात 17 वा क्रमांक आला आहे. निखिल पाठक आणि स्वप्निल खरे राज्यात अनुक्रमे चौथे आणि पाचवे आले आहेत.

युपीएससीची फायनल लिस्ट ही डिसेंबर 2015 मध्ये लेखी परीक्षा आणि मार्च -मे 2016 मध्ये मुलाखतीच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. या परीक्षेत यश मिळवलेले 1078 जण आयएसएस म्हणून नियुक्त होणार आहे. यशस्वी विद्यार्थी भारतीय परदेश सेवा (आयएफएस), भारतीय पोलीस दल (आयपीएस) आणि केंद्रीय सेवा ग्रुप 'ए' आणि ग्रुप 'ब' मध्ये काम करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2016 06:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close