S M L

पाच राज्यांचा निकाल LIVE अपडेट्स

Sachin Salve | Updated On: May 19, 2016 11:22 AM IST

पाच राज्यांचा निकाल LIVE अपडेट्स

mamata_and_Amma19 मे : आसाम,तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि पुदुच्चेरीच्या विधानसभा निवडणुकांचा आज फैसला होणार आहे. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमाराला मतमोजणी सुरू होईल. तर 11 वाजेपर्यंत मतदारांचा कल लक्षात येईल. दुपारी 12 वाजता सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार मतमोजणीचं काम दुपारी 3 वाजेपर्यंत पू्र्‌ण होईल.

मतदानोत्तर चाचण्यांनुसार आसाम, तामिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे तर प.बंगालमध्ये ममता बॅनर्जी त्यांची सत्तेवरची पकड मजबूत ठेवतील असा अंदाज आहे. उत्तराखंड प्रकरणामुळे काहीशा बॅकफूटवर आलेल्या भाजपला आसामामधली सत्ता मिळून ईशान्य भारतात पहिल्यांदाच सत्ता मिळवता येते ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. काँग्रेसला मात्र पुदुच्चेरीमध्येच अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज बांधला गेलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2016 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close