S M L

प.बंगालमध्ये ममतादीदीच, डावे-काँग्रेस नेस्तनाबूत

Sachin Salve | Updated On: May 19, 2016 03:29 PM IST

प.बंगालमध्ये ममतादीदीच, डावे-काँग्रेस नेस्तनाबूत

19 मे : पश्चिम बंगलामध्ये पुन्हा एकदा ममतादीदीची लाट कायम असून तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी घेत बहुमताचा आकडा पार केलाय. तृणमूल काँग्रेसने सकाळपासूनच आघाडी घेत ती कायम राखलीये. तृणमूलने दणदणीत 217 जागांवर आघाडी घेतलीये. बहुमताचा 148 आकडा पार करत तृणमूल काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. ममतादीदींचा झंझावतापुढे डावे आणि काँग्रेस नेस्तनाबूत झाले आहे.  61 वर्षांच्या ममता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

पश्चिम बंगालच्या आखाड्यात ममता दीदींसाठी प्रतिष्ठेची लढाई होती. कारण शारदा चिटफंड, नारदा स्टिंगमध्ये ममतांचे निकटवर्तीयांवर आरोप झाले आङे. त्यामुळे विरोधकांनी ममतादीदींना टार्गेट केलं होतं. पण जनतेनं ममतादीदींना कौल देत विरोधकांच्या आरोपांतून हवा काढलीये. तृणमूल काँग्रेसने तब्बल 217 जागांवर आघाडी घेतलीये. ममतादीदींनी स्पष्ट बहुमत मिळवत आपला गड कायम राखला आहे.

पण मतदारांवर त्याचा काही परिणाम झालेला दिसत नाही. एवढंच नाही, गेल्या वेळेपेक्षा तृणमूलच्या जागा चक्क वाढल्या आहेत. डाव्या पक्षांचा बंगालमध्ये ममतांनी साफ धुव्वा उडवला. त्याला डाव्यांचं राजकारण आणि त्यांच्या पक्षांची परिस्थितीही जबबादार आहेच. आता तृणमूलच्या या विजयानं ममतादीदी राष्ट्रीय स्तरावर ताकदवर होतील. एवढंच नाहीतर ममतांच्या विजयानं पुन्हा एकदा तिसर्‍या आघाडीच्या हालचाली वाढतील.

ममतांच्या विजयामागची काही कारणं..

- ममता सरकारचं उद्योगाभिमुख धोरण

- कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात बर्‍यापैकी यश

- ममतांची स्वच्छ प्रतिमा

- डाव्या पक्षांची ढासळलेली अवस्था

- डाव्यांकडे कणखर नेतृत्व नाही

- काँग्रेसशी युती अनेक डाव्या नेत्यांना पटली नाही

- त्यामुळे अनेक दिग्गज प्रचारात उतरले नाहीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2016 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close