S M L

'भविष्यात जास्त मेहनत करावी लागेल', राहुल गांधींनी स्विकारला पराभव

Sachin Salve | Updated On: May 19, 2016 01:36 PM IST

'भविष्यात जास्त मेहनत करावी लागेल', राहुल गांधींनी स्विकारला पराभव

19 मे : पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीतही काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जनतेचा पराभव मान्य केलाय. भविष्यात लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी जास्त मेहनत करावी लागले अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी ट्विटरवर दिली.

आसाममध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला असून भाजप पहिल्यांदाच इथं सरकार स्थापन करणार आहे. आसाम पाठोपाठ केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येही काँग्रेसला पराभवाचा धक्का बसलाय. राहुल गांधी यांनी ट्विट करून पराभवाची जबाबदारी स्विकारलीये. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार आहे. या निवडणुकीत जे उमेदवार विजयी झाले त्यांचं राहुल गांधींनी अभिनंदन केलंय. तसंच कार्यकर्ते आणि आघाडी पक्षाचे राहुल यांनी आभारही मानले. बिहार विधानसभा निवडणुकीत यशानंतर काँग्रेसला आशेचा किरण मिळाला होता. पण, आज पाचही राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची बत्ती गुल झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2016 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close