S M L

डाव्यांचं आता केरळ, काँग्रेसला 'नारळ'

Samruddha Bhambure | Updated On: May 19, 2016 02:33 PM IST

डाव्यांचं आता केरळ, काँग्रेसला 'नारळ'

19 मे :  केरळमध्ये प्रत्येक वेळी प्रमाणे या निवडणुकीतही सत्तांतराची परंपरा कायम राहिल्याचं चित्र आहे. केरळमधील सर्व 140 जागांचे कल हाती आले असून डाव्या आघाडीने सत्ताधारी काँग्रेसला जोरदार हादरा दिल्याचं स्पष्टपणं दिसत आहे. त्यामुळे अच्युतानंदन आता पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केरळात बहुमतासाठी 71 जागांची आवश्यकता असून डाव्या आघाडीने 88 जागांवर आघाडी घेत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. दरम्यान, भाजपचा एक उमेदवार आघाडीवर असून भाजपने पहिल्यांदाच इथे खातं उघडलं आहे.

गेल्यावेळी सीपीएम- 45, सीपीआय- 13, काँग्रेस- 38, इतर- 44 असं चित्र होतं. पण यावेळी काँग्रेस आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागल आहे. जिशा नावाच्या मुलीचा एर्नाकुलमा जिल्ह्यात बलात्कार करून खून करण्यात आला होता. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही प्रचारात महत्त्वाचा होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2016 02:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close