S M L

अम्मा आणि दीदींवर मतदारांची 'ममता'; काँग्रेसचं पानिपत

Sachin Salve | Updated On: May 19, 2016 03:21 PM IST

अम्मा आणि दीदींवर मतदारांची 'ममता'; काँग्रेसचं पानिपत

19 मे : प्रादेशिक पक्षांची ताकद काय असते हे पाच राज्यांच्या निवडणुकीने दाखवून दिलंय. पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींनी डाव्यांना धुळचारत सत्ता कायम राखलीये. तर तामिळनाडूमध्ये जयललितांनी सलग दुसर्‍यांदा विजय रथ खेचून आणत सत्ता कायम राखलीये. तर आसाममध्ये पहिल्यांदाच कमळ उमलले असून भाजपच्या गोटात आंनदोत्सव साजरा होत आहे. नेहमीप्रमाणे काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. काँग्रेसला कसंबसं पुद्दचेरीमध्ये यश मिळालंय.

पाच राज्यांच्या विधानसभा निकालाचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालंय. या पाचही राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणेच प्रादेशिक पक्षांनीच हुकमत गाजवलीये. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी डाव्या पक्षांचं सलग दुसर्‍यांदा पानिपत करत स्पष्ट बहुमत मिळवलंय. तर दुसरीकडे तामिळनाडूत जयललितांनी 25 वर्षांची राजकीय परंपरा मोडीत काढत सलग दुसर्‍यांदा दणदणीत विजय मिळवलाय. त्यामुळे करुणानिधींच्या डीएमकेला मोठा सेटबॅक बसलाय. या पराभवामुळे करुणानिधींचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न धुळीस मिळालंय.

केरळमध्ये मात्र, सत्ताबदल झालाय. सत्ताधारी काँग्रेसचा दारूण पराभव होऊन डावे पुन्हा सत्तेत आले आहे. केरळपाठोपाठ आसाममध्येही काँग्रेसचा पराभव झालाय. काँग्रेसच्या पराभवामुळे भाजप पहिल्यांदाच सत्तेवर विराजमान होणार आहे. आसाममधला विजयामुळे भाजपमध्ये आनंदाची लाट पसरलीये. तर दुसरीकडे काँग्रेसची सगळीकडे दाणादाण उडालीये. नाही म्हणायला पुद्दुचेरीत तेवढं काँग्रेस थोडफार यश मिळताना दिसतंय. पण हे राज्य खूपच छोटं असल्याने याला त्याचा केंद्राच्या राजकारणावर काहीच फरक पडणार नाही. याउलट भाजपने मात्र यावेळी अगदी केरळमध्येही खातं उघडत दक्षिणेतही चंचुप्रवेश केलाय तर पश्चिम बंगालमध्ये तब्बल 6 जागा जिंकल्या आहेत. प्रादेशिक पक्षांच्या या यशामुळे आता तिसर्‍या आघाडीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बिहार हा आमचा शेजारी आहे असं सांगत ममतादीदींनी तसं बोलूनही दाखवलंय. त्यामुळे भव्यिष्यात तिसरी आघाडी उदयास आली तर राजकारणात हा एक नवा आध्याय असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2016 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close