S M L

आसाममध्ये भाजपला सापडला नवा रणणितीकार!

Samruddha Bhambure | Updated On: May 19, 2016 10:06 PM IST

आसाममध्ये भाजपला सापडला नवा रणणितीकार!

Rajat Sethi

19 मे :  आसाममध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या या विजयात पडद्यामागे एका तरूणानं मोठी भूमिका बजवलीय त्या तरूणाचं नाव आहे रजत सेठी. रजत हा भाजपसाठी नवा प्रशांत किशोर असल्याचं मानलं जातं आहे. भाजपनं आसामसाठी जी वॉर रूम तयार केली होती त्याचं नेतृत्व रजत करत होता. त्यानं आणि त्याच्या टीमनं गेल्या वर्षभरापासून अतिशय बारकाईनं नियोजन करून सर्व राज्याचा आराखडा तयार केला.

'आसाम निर्माण'चा नारा देवून स्थानिक भावनेला हात घालण्याची आणि स्थानिक नेतृत्वाचा चेहेरा पुढं करण्याची योजना त्याचीच होती. भाजपचं व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यातही त्यानं महत्वाची भूमिका निभावलीय. प्रशांत किशोर यांच्या टीम मधल्या काही जणांनी ती टीम सोडून ते रजत सेठीच्या टीममध्ये सामिल झालेत असंही बोललं जातं आहे. भाजप उत्तरप्रदेशसाठी रजत सेठीचा उपयोग करून घेणार असल्याचंही बोललं जातं आहे.

कोण आहे रजत सेठी?

- हॉवर्ड युनिव्हर्सिटीतून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स

- अमेरिकेतल्या विख्यात एमआयटीमधून एमबीए

- आयआयटी खरगपूरचा कॉम्प्युटर इंजिनीअर

- अमेरिकेत हिलरी क्लिंटनच्या प्रचारातही काही काळ काम

- सप्टेंबर 2015 पासून आसाममध्ये कामाला सुरुवात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2016 10:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close