S M L

शिखर-शिंगणापूरमध्ये कावडी दाखल

27 मार्चसातार्‍यात शिखर-शिंगणापूर इथे शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी राज्यभरातून कावडी दाखल झाल्या आहेत. शिखर-शिंगणापूर इथे 8 दिवस चैत्री यात्रा भरते. त्यासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक इथूनही मोठ्या संख्येने भाविक दाखल झालेत. शिवाजी महाराजांचे हे कुलदैवत...जलाभिषेकासाठी मानाच्या कावडी डोंगर कपारीतून मुंगी घाटातून वर चढवल्या जातात. या कावडीतून नेलेल्या पाण्याचा रात्री उशिरा महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो. मानवी साखळी करून मोठमोठ्या कावडी घाटातून वर नेल्या जातात. त्यावेळी महादेवाला एकेरी नावाने हाक मारली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2010 05:27 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2010 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close