S M L

राहुल गांधींच्या गळ्यात पडणार अध्यक्षपदाची माळ ?

Samruddha Bhambure | Updated On: Jun 1, 2016 11:09 PM IST

राहुल गांधींच्या गळ्यात पडणार अध्यक्षपदाची माळ ?

01 जून :  काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या गळ्यात लवकरच अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याची माहिती काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

नवी दिल्ली येथील कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक पार पडली. यामध्ये आता पक्षातील युवा चेहर्‍यांना पुढे आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड केली जाणार आहे. पुढच्या आठवडय़ात काँग्रेसचे चिंतन शिबिर होणार असून, तिथेच पक्षाध्यक्षपदाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राहुल गांधींसोबत नवी टीम असणार आहे. या टीममध्ये ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, अजय माकन, रणदिप सुरजेवाला यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सतत होणार्‍या पराभवानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलासाठी दबाब वाढत असल्याचं बोलल जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2016 07:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close