S M L

मथुरा हिंसाचारानंतर हेमा मालिनी वादाच्या भोवर्‍यात

Samruddha Bhambure | Updated On: Jun 3, 2016 07:14 PM IST

मथुरा हिंसाचारानंतर हेमा मालिनी वादाच्या भोवर्‍यात

03 जून : मथुरा हिंसाचाराने धगधगत असताना हेमा मालिनी मात्र स्वतःच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात मग्न होत्या. मथुरा हा हेमा मालिनी यांचा मतदारसंघ आहे. स्वत:च्या मतदारसंघात इतकी गंभीर घटना घडत असताना लोकप्रतिनिधीम्हणून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं. पण याउलट हे फोटोज् शेअर करून हेमा मालिनी यांनी जनतेचा रोष ओढावून घेतला.

मथुरेत आज (शुक्रवारी) सकाळी जवाहर बाग इथल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर स्थानिकांनी गोळीबार केला. यामध्ये पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रमुख संतोष कुमार यांचा मृत्यू झाला. या घटनेत आंदोलनकर्त्यांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींची संख्या 100हून अधिक आहे.

दरम्यान, हेमा मालिनी यांनी दुपारी 12 वाजता या घटनेची माहिती मिळाल्याचं ट्विटरवरून सांगितलं. पण त्याआधी त्यांनी 'एक थी राणी' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे फोटो शेअर केले.

मुंबईतील मड इथल्या समुद्रात बोटीतून प्रवास करत असल्याचे फोटो हेमा मालिनी यांनी शेअर केलेत. मतदारसंघात हिंसाचार सुरू असताना लोकप्रतिनिधी मात्र शूटिंगमध्ये व्यस्त असल्याची टीका सोशल मीडियातून सुरू झाली.

हेमा मालिनी यांच्या फोटोवर सोशल मीडियातून आलेल्या प्रतिक्रियांपाठोपाठ पक्षाने देखील यावर नाराजी व्यक्त केली आणि संबंधीत फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले. थेट पक्षाकडून आलेल्या आदेशामुळे हेमा मालिनी यांना संबंधीत फोटो काढून टाकावे लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2016 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close