S M L

मायावतींचा सोनिया गांधींना शह, रायबरेलीत रेल्वे कारखान्यासाठी दिलेली जागा परत घेण्याचा निर्णय

13 सप्टेंबर, रायबरेली - उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी, काँग्रेसला पुन्हा एकदा शह दिला आहे. सोनिया गांधींचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमध्ये, रेल्वेचाकारखाना उभारण्याला, मायावती यांनी जागा देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे या कारखान्याचं सोनिया गांधी यांच्या हस्ते दोन दिवसांनतर भूमीपूजन होणार होतं. या निर्णयामुळे मायावतींनी काँग्रेसविरूद्धचं युद्ध यावेळी थेट सोनिया गांधींनाआव्हान देत सुरू केल्याचं मानलं जात आहे.सोनियांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमध्ये रेल्वे बोगी कारखान्यासाठी देण्यात आलेली जागा परत घेण्याचा निर्णय मायावती यांनी घेतलं आहे. रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांच्या रायबरेली दौर्‍याच्या दोन दिवस आधी मायावतींनी हा निर्णय घेतला आहे. यावर टीका करताना लालूप्रसाद यादव म्हणाले, ' ही जमीन शेतकर्‍यांची नाही, तर ग्रामपंचायतीची आहे. ही जमीन द्यायला शेतकर्‍यांचा कोणताही विरोध नाही, तर मायावतींची ही राजकीय चाल आहे. 'दरम्यान ही जागा कारखान्यासाठी देण्याच्या निर्णयाला स्थानिक शेतकर्‍यांनी विरोध केल्यानंच हा निर्णय घेतल्याचं उत्तरप्रदेश सरकारनं स्पष्ट केलं अहे. ' जनतेत ही जमीन देण्यावरून प्रचंड नाराजी आहे. या प्रकरणाचा परिणाम हिंसक आंदोलनात होऊ नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव विजय शंकर पांडे यांनी व्यक्त केली. 'राहुल गांधी यांनी बुंदेलखंडात दौरे सुरू केले तेव्हाही मायावती यांनी त्यात अडथळे आणले होते, तर बसपाच्या खासदारांनी संसदेतविश्वासदर्शक ठरावाच्यावेळी राहुल गांधी यांनाच लक्ष्य केलं होतं. त्यांच्या या निर्णयावरही काँग्रेसनं टीका केली आहे. ' एकिकडे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री रेल्वे कारखाना आपल्या राज्यात यावा यासाठी प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे मायावती हा कारखाना राज्यातून घालवत आहेत ' अशी टीका कँग्रस सरचिटणिस दिगविजय सिंह यांनी केली. मायवतींचा भाजप विरोध आणि आता काँग्रेसविरूद्ध पुकारलेला संघर्ष या पार्श्वभूमिवर मायावती येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये तिसर्‍या आघाडीचं नेतृत्व करणार, असं स्पष्ट होत आहे. त्यामुळेच उत्तरप्रदेशात अमेठी आणि रायबरेलीत वर्चस्व असलेल्या काँग्रेसला थोपवण्याचे सर्व प्रयत्न त्या करत असल्याचं बोललं जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2008 10:13 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2008 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close