S M L

राजीनाम्यानंतर एकनाथ खडसेंची दिल्लीवारी

Sachin Salve | Updated On: Jun 10, 2016 05:55 PM IST

राजीनाम्यानंतर एकनाथ खडसेंची दिल्लीवारी

दिल्ली - 10 जून : महसूलमंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर एकनाथ खडसे आज पक्षश्रेष्ठीची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठली. पण, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि नितीन गडकरी यांचीच खडसेंनी भेट घेतली.

एमआयडीसी भूखंड प्रकरण, दाऊद कॉल प्रकरण आणि कथीत पीए गजानन पाटील लाच प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आधी एकनाथ खडसेंनी राजीनामा देण्यास नकार दिला. पण, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर खडसेंना राजीनामा सोपवावा लागला. राजीनामा दिल्यानंतर खडसेंनी आज दिल्ली गाठली. भ्रष्टाचार प्रकरणात निर्दोष असल्याचे पुरावे देऊन त्यांनी आपल्यावरचे भ्रष्टाचाराचे डाग पुसण्याचा खडसेंचा प्रयत्न केला. एकनाथ खडसे यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी आणि संघटनमंत्री रामलाल यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच परदेश दौर्‍यावरुन परतल्यामुळे ते कुणालाही भेटणार नव्हते. तर अमित शहा हे हैदराबाद दौर्‍यावर असल्यामुळे त्यांची भेट अशक्य होती. खडसे यांनाही याची जाणीव होती. त्यामुळे पंतप्रधान अमित शहांची भेट घेण्यासाठी आपण दिल्लीला आलो नाही असं खडसेंच्या गटातून सांगण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2016 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close