S M L

बेळगावच्या मराठी नगरसेवकांची ससेहोलपट

31 मार्चबेळगावातील 40 मराठी समर्थक नगरसेवकांची ससेहोलपट सुरूच आहे. बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराबदद्ल हे नगरसेवक कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांची भेट घेण्याकरता गेले होते. पण त्यांना ही भेट नाकारण्यात आली. आणि पोलिसांनी या नगरसेवकांना बंगळुरू सोडायला भाग पाडले. कन्नड रक्षक वेदिकेचे कार्यकर्ते अटकेतमराठी नगरसेवक बंगळुरूमध्ये पोहोचताच तेथे कन्नड रक्षक वेदिकेचे कार्यकर्तेही पोहोचले. आणि त्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी कन्नड रक्षक वेदिकेच्या या कार्यकर्त्यांना अटक केली. बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाला आहे. मराठी महापौर होऊ नये म्हणून, मराठी उमेदवाराचा अर्जच अवैध ठरवण्याचा प्रकार या निवडणूक प्रक्रियेत घडला. या गैरप्रकाराची दाद मागण्यासाठी मराठी समर्थक नगरसेवकांचे शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांची भेट घेण्यास गेले होते.अधिवेशनात पडसादबेळगावचा हा मुद्दा आज विधीमंडळातही गाजला. विरोधकांनी या प्रकरणी स्थगन प्रस्तावाची मागणी केली. पण सरकारने स्थगन प्रस्तावाची मागणी फेटाळली. शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांनी हा प्रस्ताव मांडला होता. विधानसभेत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यानंतर गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज 10 मिनीटे स्थगित ठेवण्यात आले. यावेळी बेळगावात घडले ते चुकीचे आहे.याबाबत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. आम्ही याबाबत मुख्यमंत्री येडीयुरप्पांना पत्र लिहिणार आहोत, असे निवेदन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. यावर तोडगा निघेपर्यंत बेळगाव, निपाणी केंद्रशासित करावे, असे गणपतराव पाटील म्हणाले. तर या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी दिल्लीला शिष्टमंडळ न्यावे, अशी मागणी भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2010 09:48 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2010 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close