S M L

जोधपूरजवळ मिग 27 विमान कोसळलं

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2016 02:01 PM IST

जोधपूरजवळ मिग 27 विमान कोसळलं

13 जून : राजस्थानमधील जोधपूरजवळ एक मिग 27 विमान कोसळलं. सुदैवानं या अपघातात दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत आणि इतरही कोणती जीवितहानी झालेली नाही. या अपघातात 3 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

हे विमान जोधपूरपासून 2 किमी अंतरावर कुंडी भगतसनी भागात कोसळलं. त्यामध्ये 2 घरं जमीनदोस्त होऊन बरंच नुकसान झालंय. दुर्घटनेचं कारण समजू शकलेलं नाही. गेल्या वर्षीच मिग विमानं सेवेतून वगळण्यात येतील अशी घोषणा हवाई दलानं केली होती. मात्र, ती कागदावरच राहिलेली दिसतेय. या अपघातप्रकरणी हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2016 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close