S M L

उत्तर प्रदेशात मोदींनी फुंकलं विधानसभा निवडणुकीचं रणशिंग

Samruddha Bhambure | Updated On: Jun 13, 2016 10:26 PM IST

उत्तर प्रदेशात मोदींनी फुंकलं विधानसभा निवडणुकीचं रणशिंग

13 जून : उत्तर प्रदेशातही आसामसारखा बदल घडला पाहिजे, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (सोमवारी) उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलं. अहलाबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठकीची सांगता आज झाल्यानंतर या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.

यावेळी मोदींनी उत्तर प्रदेशच्या विकासाची हमी देताना मुलायमसिंह आणि मायावती यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात भाजपला समर्थन मिळत असून, केंद्र सरकारमध्ये उत्तर प्रदेशचा दबदबा आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री उत्तर प्रदेशमधीलच असल्याने उत्तर प्रदेशचा विकास निश्चित आहे असून उत्तर प्रदेशमध्येही आसामसारखा बदल घडला पाहिजे, असं मोदी यांनी सांगितलं.

तसंच देशातील जातीयवाद थांबेल तेव्हाच देशाचा खरा विकास होईल असं मतदेखील मोदींनी यावेळी व्यक्त केलं आहे. उत्तर प्रदेश वशिलेबाजी, जातीयवाद, वाढती गुन्हेगारी या दुष्टचक्रात अडकला आहे. केवळ विकासाचा यज्ञच त्याचा नायनाट करेल, असे मोदींनी या सभेत सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2016 08:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close