S M L

'ब्रेक्झिट'मुळे शेअर बाजारात घसरण, सोन्याच्या दरात 1700 रुपयांनी वाढ

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2016 03:39 PM IST

'ब्रेक्झिट'मुळे शेअर बाजारात घसरण, सोन्याच्या दरात 1700 रुपयांनी वाढ

24 जून : ब्रिटन युरोपीयन महासंघातून बाहेर पडल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारासह सोन्याच्या दरावरही झालाय. सोन्याच्या दरात एक तोळ्यामागे तब्बल 1700 रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी सोन्याचे आजची किंमत 31,614 रुपये झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दराने दोन वर्षांपूर्वीच्या उच्चांकी पातळी गाठली आहे. तर चांदीचे दरही वधारले आहे. चांदीची किंमतीत आजच्या दिवसात 1400 रुपयांची वाढ झाले आहे. त्यामुळे चांदीचा आजचा दर प्रति किलो 42,500 रुपये झाला आहे.

सेन्सेक्स थेट 974 अंक, म्हणजेच साडे तीन टक्क्यांनी घसरलंय. तर निफ्टी 265 अंकांनी घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपयाही 74 पैशांनी घसरला. घसरत्या बाजाराला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं मध्यस्थी गेल्याचं सूत्रांनी सांगितलंय. शेअर बाजारात स्थिरता आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं बाजारात रोख भांडवल वळतं केल्याचं सांगण्यात आलं. ब्रिटन बाहेर पडल्यास भारतीय कंपन्यांचं नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळेच ही घसरण दिसून येतेय.

टाटा मोटर्सचे शेअर्स जवळपास 10 टक्क्यांनी घसरले आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपनीच्या नफ्यात घट होईल, असं गुंतवणूकदारांना वाटतंय. याचं कारण म्हणजे जर ब्रिटन युरोपिअन महासंघातून बाहेर पडला, तर जॅग्वार आणि लँड रोव्हरच्या गाड्यांच्या किंती वाढतील, ज्याचा परिणाम कंपनीच्या महसूलावर होईल. कारण या गाड्यांवर नवे कर लादले जातील. या सगळ्यामुळे आज शेअर बाजारात टाटा मोटर्सच्या शेअर्सना चांगलाच फटका बसलाय. पुढच्या 10 वर्षांमध्ये जॅग्वार लँड रोव्हरच्या नफ्यात दीड अब्ज डॉलर्सची घट होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

या सर्व घडामोडींवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रतिक्रिया दिलीय. राजन म्हणता, "आमचं सर्व प्रकारच्या बाजारांवर लक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीसाठी आम्ही तयार आहोत. गरज पडली तर परकीय चलन बाजारात आम्ही हस्तक्षेप करू आणि भांडवलही वळवू. रुपयाची घसरण इतर चलनांमधल्या घसरणीपेक्षा कमी आहे. "

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2016 03:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close