S M L

ब्रिटनच्या 'एक्झिट'मुळे भारतावर कोणते परिणाम?

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2016 04:58 PM IST

 ब्रिटनच्या 'एक्झिट'मुळे भारतावर कोणते परिणाम?

24 जून : ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ब्रिटनच्या या ब्रेक्झिटमुळे जगभरात याचे परिणाम होणार आहे. याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल याबद्दल जाणून घेऊया...

- शेअर बाजारात झालेली घसरण हा तात्पुरता परिणाम असेल

- अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारताची परकीय गंगाजळी मजबूत

- सध्या भारताकडे 363 अब्ज डॉलर्स इतकं परकीय चलन

- ब्रिटनमध्ये मोठा आर्थिक व्यवहार असलेल्या भारतीय कंपन्यांना फटका

- सध्या 800 भारतीय कंपन्या ब्रिटनमध्ये कार्यरत

- या सर्व कंपन्यांमध्ये मिळून 1 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी

- अल्प काळासाठी आयटी कंपन्यांवर विपरीत परिणामाची शक्यता

- दीर्घ मुदतीमध्ये आयटी कंपन्यांची कामगिरी संमिश्र राहण्याची शक्यता

- भारत आणि ब्रिटनचा सध्याचा द्विपक्षीय व्यापार 14 अब्ज डॉलर्स, तो कायम राहण्याची अपेक्षा

- गेल्या दशकभरात भारत आणि ब्रिटनदरम्यानच्या व्यापारात सातत्यानं वाढ

- त्याच कालावधीत युरोपियन युनियनबरोबरच्या एकूण व्यापारात घट

- आता भारताला युरोपियन युनियनमधल्या इतर देशांबरोबरचा व्यापार वाढवण्याची संधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2016 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close