S M L

सानियाच्या घरी लगीनघाई

4 एप्रिल 'दुनिया की कोई भी ताकत अब हमे नही रोक सकती...'या फिल्मी डायलॉगप्रमाणे सध्या सानिया मिर्झा आणि शोएब मलिकने निश्चय केला आहे. कितीही उलटसुलट चर्चा सुरू असली, अडथळे येत असले तरी त्यावर मात करून विवाहबद्ध होण्याचे सानिया आणि शोएबने ठरविले आहे. हैदराबादमध्ये सानियाच्या घरी सध्या एकच लगीनघाई उडाली आहे. दोघांचे कुटुंबीय लग्नाची जोरदार तयारी करत आहेत. भावी जावईबापू शोएब सध्या सासुरवाडीत म्हणजे सानियाच्या घरी आहे. लग्नाच्या तयारीची बोलणी सुरू आहेत. 15 एप्रिल रोजी हे दोघे विवाह करणार आहेत. दरम्यान, सानिया शोएबच्या लग्नासाठी शोएबची पहिली पत्नी आयेशा सिद्दिकीच्या परवानगीची गरज आहे, असा दावा आयेशाच्या वकिलांनी केला आहे. आयेशाच्या कुटुंबीयांनी शनिवारी शोएबला कायदेशीर नोटीस पाठवली होती. आणि अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. भारतात शिवसेना, बजरंग दल, समाजवादी पार्टी आदींनी या विवाहास विरोध दर्शवला आहे. तर पाकिस्तानात मात्र शोएबच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.आता सानियाचे लग्न हैदराबादमध्ये होणार की दुबईत, याची उत्सुकता सानिया आणि शोएबच्या चाहत्यांना लागली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2010 07:04 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2010 07:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close